सुगी ग्रुप गेली ३५+ वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. आज मुंबई मधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बांधकाम व्यावसाईकांपैकी आम्ही एक आहोत. विश्वास, चिकाटी, सचोटी आणि पारदर्शकतेने सुगी ग्रुपने प्रत्येक वेळी निष्पक्ष, प्रामाणिक व्यवहारांमुळे लोकांच्या मनात सद्भावना निर्माण केली आहे.
म्हणूनच सर्वोत्तम पुनर्विकास प्रकल्प विकासक व पुनर्विकास विशेषज्ञ म्हणून सुगी ग्रुपची ख्याती आहे. मुंबईचा मध्य समजल्या जाणाऱ्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज पार्क या क्षेत्रातून आम्ही आमचे काम लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. या भागाशी आमची एक नाळ जोडली गेली आहे. शिवाय या भागाला एक सांस्कृतिक वारसाही आहे.
अतिशय समृद्ध आणि वैभवशाली संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी “सुगी परिवार” एक छोटासा प्रयत्न आहे.
कलाक्षेत्रातील सुप्रिसिद्ध आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी छत्रपती शिवाजीमहाराज पार्कला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.
अशा समृद्ध वास्तु मध्ये आमच वास्तव्य आहे आणि त्यामुळेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क च सामाजिक देणं लागतो या भावनेतून या ख्यातनाम कलाकारांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही
“छत्रपती शिवाजी महाराज पार्क” या नावाने कार्यक्रम रूपी शृंखला.

अविस्मरणीय क्षण
दिवाळी पहाट २०२४
संगीतमय कार्यक्रम
दिवाळीच्या उत्सवाची सुरेल सुरुवात करत, सुगी परिवाराने दादर समुद्रकिनाऱ्यावर दिवाळी पहाट आयोजित केली, ज्यामध्ये नरक चतुर्दशीच्या मंगल सकाळी ५,००० हून अधिक दादर आणि आसपासच्या क्षेत्रातील संगीतप्रेमी उपस्थित होते. प्रख्यात शास्त्रीय गायक श्री राहुल देशपांडे आणि प्रियंका बर्वे यांनी आपल ्या सुरेल गायनाने वातावरण रंगवले, तर श्री संकर्षण कऱ्हाडे यांच्या काव्यमय निवेदनाने उपस्थितांचे मनजिंकले. विठ्ठल गीताने समारोप झाला आणि सर्वांना दिवाळी फराळाचे वाटप करून उत्सवाची सांगता झाली.
फिर रफी, जुलै २०२४
तीन दिवसांचा विशेष संगीत महोत्सव
मोहम्मद रफी यांच्या आवाजातील विविधता आणि अष्टपैलुपणामुळे ते भारतीय संगीताच्या जगतातील एक अमूल्य रत्न ठरले. कोणत्याही अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेप्रमाणे आवाजाला साजेसा बदल करण्याची त्यांची अविस्मरणीय कला आणि लिप-सिंकिंगमधील उत्कृष्टता त्यांना संगीतविश्वात अद्वितीय स्थानदेते. त्यांच्या या अनमोल योगदानाला आदरांजली देण्यासाठी सुगी कडून मुंबईतील विविध नाट्यगृहात तीन दिवसीय भव्य संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक श्रीकांत नारायण, त्यांच्या सहगायिका सरिता राजेश, आणि त्यांच्या समूहाच्या अप्रतिम सादरीकरणाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले. त्या सुरेल संध्याकाळीचे निवेदनश्री. अमित काकडे यांनी आपल्या सुरेल आवाजात केले. या महोत्सवाच्या प्रत्येक क्षणाने प्रेक्षकांची मनं मोहून टाकली आणि अखेरीस मोहम्मद रफी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत याआनंदमयी सोहळ्याचा समारोप झाला.
अभंगवारी, जुलै २०२४
भक्तिसंगीतांची वारी.
सुगी प्रस्तुत अभंगवारी, पंडित डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त, वसंतोत्सव आणि श्री. राहुल देशपांडे यांनी आयोजित केलेला एक हृदयस्पर्शी संगीत कार्यक्रम. शिव (Sion) येथील प्रतिष्ठित श्री. षण्मुखानंद चंद्रशेखरेन्द्र सरस्वती सभागृहात हा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. राहुल देशपांडे आणि त्यांच्या गायन समूहाच्या उपस्थितीने एक मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण केले. प्रेक्षकांच्या हृदयात प्रिय विठ्ठल रुक्मिणीचे दिव्य प्रतिबिंब उमटवले जणू काही त्यांची उपस्थिती लोकांच्या मनात अवतरली होती. या अद्भुत संगीत संध्येचा भक्तीभावाने आणि श्रद्धेने समारोप झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या भक्तिपूर्ण समारंभात सहभागी होण्याचा आम्हाला मनापासुन आनंद आहे.
गीत रामायण, जून २०२४
संगीतमय कार्यक्रम
गीत रामायण - रामचरित्राची सुरेल अनुभूती. गीत रामायण हे मराठी भाषेतील ५६ गीतमालेचा काव्यसंग्रह आहे, जो भारतीय हिंदू महाकाव्य असलेल्या रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार वर्णन करतो. श्री. ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि श्री. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीत रामायण हे मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. गीत रामायण हे केवळ या दोघांच्या एकत्र प्रवासाचाच कळस नव्हे तर मराठी भावसंगीतातलाच तो कंठमणी आहे. असा हा प्रसिद्ध संगीत कार्यक्रम श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध संगीतकार डॉ. श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, धनंजय म्हसकर आणि हृषिकेश अभ्यंकर या मान्यवर गायकांच्या उपस्थितीने ही मधुर संध्याकाळ रंगली. अशा या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीत कार्यक्रमाची भक्ती भावाने सांगता झाली.
सुगी परिवार आयोजित दिवाळी पहाट, नोव्हेंबर २०२३
संगीतमय कार्यक्रम
सुगी परिवाराने दादर बीचवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध गायक श्री राहुल देशपांडे यांच्या पहाट दादरकरांसह अनेक मुंबईकरांची दिवाळी पहाट संस्मरणीय केली. ह्या संगीतमय कार्यक्रमाला ५००० हुन अधिक लोकांनी मन: पूर्वक प्रतिसाद दिला. सुरेल आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुश ्री. आर्या आंबेकर यांनी काही संस्मरणीय मराठी गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. श्री. राहुल देशपांडे यांनी त्यांच्या समूहातील सुरेल गाणी गाऊन सर्वांचे मन मंत्रमुग्ध केले. अशा या दिग्गज जोडीला अभिनेता श्री. संकर्षण कऱ्हाडे यांनी उत्तम निवेदन करून कार्यक्रमाची शान वाढवली. कार्यक्रमाची सांगता, गायक वादकांचा सत्कार आणि त्यानंतर घरी परतताना सर्व उपस्थितांना फराळ वाटून झाली.
संस्कृती - आपली परंपरा, सप्टेंबर २०२३
आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपणारे पुस्तक.
अतिशय समृद्ध आणि वैभवशाली परंपरा यांची एकत्रित केलेली माहिती सर्वांपर्यंत सहजपणे पोहचविण्यासाठी सुगी परिवारा कडून केलेला हा एक छोटासा प्रयत्न
@छत्रपती शिवाजी महाराज पार्क, सप्टेंबर २०२३
पुष्प पहिले - सुधीर फडके
सुगी परिवार आयोजित "@छत्रपती शिवाजी महाराज पार्क" रुजलेली ओळख... आठवणींना उजाळा! पुष्प पहिले. छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे नाव जगप्रसिद्ध करणाऱ्या अशा सर्वांच्या प्रति आपल्या भावना सदैव ऋणांच्या आहेत. म्हणूनच त्यांच्या कार्याची उजळणी व त्यांच्या स्मृतीं ना मानवंदना देण्यासाठी सुगी परिवारातर्फे हा एक छोटोसा प्रयत्न. या शृंखलेतील पहिले पुष्प, मराठीतील ज्येष्ठ संगीतकार, गायक स्व. सुधीर फडके यांच्या कार्यक्रमातील काही अविस्मरणीय आठवणी.
यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी विद्यार्थ्यांचे सत्कार, जुलै २०२३
यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी परीक्षेतील पदवी धारकांचा सत्कार समारंभ.
यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी परीक्षांमधील सर्व पदवी धारकांचा सत्कार करण्यासाठी एका आनंददायी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य समारंभाची सुरुवात प्रतिभावान जोडीने मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने झा ली. मान्यवर आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत मा.राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते कर्तृत्ववान उमेदवारांना पारितोषिक देवून कार्यक्रमाची शोभा वाढली त्यांच्या प्रोत्साहनाच्या आणि मनःपूर्वक अभिनंदनाच्या शब्दांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि त्यांना आशादायक आणि समृद्ध भविष्यासाठी प्रेरणा दिली. आम्ही सर्व यश मिळविणाऱ्या विद्यार्थाना हार्दिक शुभेच्छा देतो.
जाणता राजा, मार्च २०२३
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाल प्रेरणादायी जीवनपटावर आधारित असलेले ऐतिहासिक महानाट्य.
जाणता राजा हे प्रसिध्द महानाट्य प्रस्तुत करणे सुगी ग्रुपचे मोठे भाग्य आहे. या महानाट्यामध्ये शिवराज्याभिषेकासह १७ व्या शतकातील प्रसंग पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आले. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या संकल्पनेतून आणि लेखणीतून हे महानाट्य जन्माला आले. रंगमंचावर अनेक नवीन प्रयोग या महानाट्याच्या निमित्ताने प्रथमच झाले. खुल्या मैदानात उभारलेला ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद असा प्रशस्त रंगमंच; ध्वनिमुद्रित संवाद आणि गाणी व तसेच हत्ती - घोडे यांचा प्रत्यक्ष वापर; एकूण कलाकारांची संख्या २००; महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचं कथानकाच्या अनुषंगाने सादरीकरण; अशी या महानाट्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आले होते आणि दररोज संध्याकाळी ८००० हून अधिक प्रेक्षकांनी साद दिली.